वेडे मन
कळत नाहि हे वेड मन प्रेम का करते? मग त्या व्यक्ती करिता मन क्षना क्षणात झूरते. त्याच्या आठवणीत मी मात्र थोडी थोडी मरते. नेहमी वाटते त्या व्यक्तीच्या सहवासात कुठे तरी एकांतात बसावे. त्या व्यक्ती सोबत एकंदरीत मन भरून हसावे. त्या व्यक्ती व्यतिरिक्त जणू संपूर्ण आपल्या करीता काहीहि नसावे. परंतु असा आपला आवडता व्यक्ती आपल्या जवळ नसल्यास मन क्षना क्षणात झुरते. हे वेड मन प्रेम का करते? मन हे किती वेडे असते न कडत कधी कुठे हि जुडते. संपूर्ण जगाशी आपण जिंकतो त्या व्यक्ती समोर आपण स्वतः हरते. तू येणार मला भेटायला हे कळताच जणू मी हवेतच उडते. तुझी आठवण येताच घरच्यांशी लपवून मि किती रडले. कधी कळलेच नाही तुझ्याशी ऋूणानु बंध कधी जुडले. मन हे किती वेडे असते न कडत कधी कुठे हि जुडते. मग त्या व्यक्ती करिता मन क्षना क्षणात झूरते. त्याच्या आठवणीत मी मात्र थोडा थोडा मरते.
Comments
Post a Comment